Deepak kesarkar claim that shivsena may unite again uddhav thackeray ajit pawar Maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : …तर शिवेसना पुन्हा एकत्र येईल; दीपक केसरकरांनी सांगितला फंडा

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करतआपल्या समर्थकांसह भाजपशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन केले. त्यावेळी दोन्ही गटांना जोडण्यासाठी खूप प्रयत्नही झाले. मात्र, तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी बोलून दाखवली आहे.

यावेळी केसरकर यांनी एक अट उद्धव ठाकरेंसमोर ठेवली आहे. यानुसार उद्धव ठाकरेंनी स्वतःहून काय चूक केली ते आत्मपरीक्षण करावे. त्यामुळे हे सर्व घडले. असेच कोणी पक्ष सोडत नाही, असे केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरेंना आपली चूक लक्षात आल्यास पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतो असे दीपक केसरकर यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, आपण सर्वजण बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांना मानणारे लोक असेच पक्ष सोडत नाहीत. त्यामुळेच यात काही ना काही असे घडले असावे ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर प्रकरण काय आहे, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनीच करावे. त्यांनी हे केले आणि मुद्दा समजून घेतला, तर पक्ष पुन्हा एकत्र यायला वेळ लागणार नाही, असे केसरकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?

दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर आहे पण कटुता कशी कमी करायची हे पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. मी काल ज्यावेळेला त्यांना भेटलो तेव्हा ते भावनाविवश झालेले होते. मी लोकांचा आदर करणारा व्यक्ती आहे. उद्धव ठाकरे मला भेटले तेव्हा मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही.

यावेळी बोलताना केसरकर यांनी अजित पवारांची देखील स्तुती केली. अजित पवार हे निर्मळ मनाचे माणूस आहेत, असे सांगत केसरकर यांनी त्यांचे कौतुक केले. बाहेरून ते जितके कठोर दिसतात, प्रत्यक्षात ते तितके कठोर नसतात, त्यांचे मन शांत असते. केसरकर म्हणाले की, विरोधी पक्षनेता अजित पवारांसारखा असावा.

दरम्यान अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि केसरकर यांची भेट घडली होती. केसरकर बाहेर येत होते तर उद्धव ठाकरे दालनात जात होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि केसरकर यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

ठाकरे आणि केसरकर यांच्यात काही सेकंद चर्चा झाली. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात आणि विधीमंडळाबाहेर सुरू असलेल्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. शाखा ताब्यात घेणं, कार्यालय ताब्यात घेणं हे शोभत नाही, अशा शब्दात उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर केसरकर यांनी आमच्यावर अजुनही तुम्ही नाराज आहात का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर ते निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT