nana patole Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Congress: पक्षातील नेत्यांमुळे नाना पटोलेंच्या अडचणीत वाढ; होणार मोठी कारवाई

काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

धनश्री ओतारी

काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. परिस्थिती बदलायची असले तर प्रदेशाध्य बदलायला हवा, असे मत पक्षातील नेत्यांनी व्यक्त करत. थेट नाना पटोलेंविरोधात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार दाखल केली.(Demand for removal of Nana Patole from Congress vijay wadettiwar maharashtra politics)

नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत पक्षातील एका शिष्टमंडळाने दिल्लीचे दार ठोठावले आहे. पक्षश्रेष्ठींकडे आपल्या अडचणी सांगितल्याची माहिती विजय वडेट्टिवार यांनी दिली आहे.

राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नाना पटोलेंविरोधात पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. जी काय समस्या आहे ती आम्ही पत्राद्वारे अध्यक्षांकडे पोहचवली आहे. अशी माहिती वडेट्टिवार यांनी दिली आहे.

राज्यातील कोणत्याही नेत्याशी पटोले यांचा समन्वय दिसत नाही. ते एकटेच पुढे जातात कोणालाही विचारात किंवा बरोबर घेत नाहीत. नाना पटोले महाराष्ट्रातील 'नवज्योत सिंह सिद्धू' झाले आहेत. काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल, असं शिष्टमंडळाचं मत असल्याचं समजलं आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस यांच्या कार्यकारिणीचे गठण झाल्यावर तातडीने महाराष्ट्राबाबत विचार केला जाईल आणि योग्य तो निर्णय देण्यात येईल, असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

Latest Marathi News Live Update: कल्याण पूर्वेतील पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य

Medical Admission Scam : वैद्यकीय प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांना सीईटी सेलची नोटीस

Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

SCROLL FOR NEXT