abdul sattar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : कृषी विभागाच्या धाडी बोगस?, दिपक गवळी कोण? सत्तारांनी स्पष्ट सांगितले

Sandip Kapde

Abdul Sattar :   राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश असल्याची माहीती समोर आली होती.

अकोल्यातील एमआयडीसीमध्ये या कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकामध्ये कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक(P.A) दिपक गवळींचा देखील समावेश असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान या प्रकरणावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार स्पष्टीकरण दिले.

दिपक गवळी कोण?

अब्दुल सत्तार म्हणाले,  दिपक गवळी माझा ओएसडी नाही पीए आहे. कृषी विभागाच्या कामात मी कोणताही माणूस घेऊ शकतो. मी काही एका माणसाचा मंत्री नाही पूर्ण विभागाचा मंत्री आहे. मला पूर्ण अधिकार आहेत.

पथक अधिकृत -

कृषी विभागाचे धाड पथक मी नेमले आहे. बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी हे पथक नेमले आहे, असे सत्तार यांनी सांगितली आहे.

पथकात खासगी व्यक्ती नाहीत. ४२ अधिकारी पथकात होते. फक्त एक गवळी होता म्हणून चर्चा होते. बोगस बियाणे तिप्पट किंमतीने विकेल जातात. याची देखील माध्यमांनी माहिती जनतेला द्यावी. आम्ही केलेली कारवाई अधिकृत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत मी कुणाचेही ऐकणार नाही. कुणाकडे बोगस माल असेल तर नष्ट करावा, असे सत्तार म्हणाले.

५ लाख मागितल्याचा आरोप -

या आरोपाची चौकशी होणार आहे. गुन्हेगाराला माफी होणार नाही. एसीबीच्या नोटा द्यावा. माझा ओएसडी असला तरी सर्वांसाठी एकच नियम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT