deputy cm ajit pawar reaction on pooja chavan suicide case 
महाराष्ट्र बातम्या

पूजा चव्हाण प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया, 'निष्पाप व्यक्तीवर संशय नको'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आज, पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीवरही भाष्य केले. एखाद्या प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवू नये, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. मंत्री संजय राठोडे हे बेपत्ता नाहीत, संपर्कात आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुंडे प्रकरणात काय झालं?
अजित पवार म्हणाले, 'मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागितला जात आहे. पण, एखाद्या व्यक्तीची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय आपण, त्याला दोषी कसं ठरवणार. यात कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच नाही. मुळात धनंजय मुंडे प्रकरणातही असच झालं. काही माहिती न घेता जर, मुंडे यांचा राजीनामा घेतला असता तर काय झालं असतं? त्या प्रकरणात नंतर त्याच मुलीनं स्टेटमेंट बदललं. त्यामुळं जोपर्यंत चौकशीचा अंतिम अहवाल येत नाही. तोपर्यंत पेशन्स ठेवायला हवेत.' संजय राठोड हे शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेना पक्षच त्यांच्याबाबत निर्णय घेऊ शकतो. पण, तटस्थ व्यक्ती म्हणून, मला या प्रकरणात पेशन्स ठेवायला हवेत, असं वाटतं, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तपास सुरू आहे
पुणे पोलिस या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू आहे. यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. दुसऱ्या व्यक्तीचा शोधही सुरू आहे. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी पुण्याला जाऊन आले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहितीही घेतली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी या वेळी दिली.

'पुण्यात मी माहिती घेईन'
मीडिया ट्रायलवरूनही अजित पवार यांनी झापले. सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना अनेकदा एखाद्याला टार्गेट कऱण्यात येतं. तेव्हा व्यक्ती पुढे न येता काही काळ बाजूला राहते. याआधी धनंजय मुंडे हे सुद्धा स्पष्टीकरण दिल्यानंतर बाजूला राहिले होते असंही अजित पवार यांनी सांगितले. अधिक माहिती विचारली असता अजित पवार म्हणाले, 'गुन्हा जिथं घडला तिथले पोलिसच याबद्दल सांगू शकतील. मी गृहमंत्री नाही पण मी पुण्याला गेल्यानंतर पोलिसांकडून माहिती घेईन. आढावा घेतल्यानंतर त्याची चौकशी किती दिवस चालेल? काय परिस्थिती आहे हे पाहीन.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT