Devendra Fadnavis Nana Patole Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन सारखं काम करणार; नाना पटोलेंचा टोला

कालच पालकमंत्र्यांची घोषणा झाली असून त्यावरुनच नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पालकमंत्र्यांची घोषणा केली. यातल्या बहुतांश मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे.

पालकमंत्र्यांच्या घोषणेवरुन आज नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारने लोकशाहीची थट्टा चालवल्याची टीकाही केले. नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो. या वेळची व्यवस्था वेगळी आहे. प्रशासनाचं व्यवस्थापन योग्य नाही. महाराष्ट्रात शासनच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीची थट्टा सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांची जबाबदारी आहे. ते आता स्पायडरमॅनसारखं काम करणार काय?

जाणून घ्या राज्यातल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री:

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली

  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

  • सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

  • चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

  • विजयकुमार गावित- नंदुरबार,

  • गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

  • गुलाबराव पाटील - बुलढाणा,

  • दादा भुसे- नाशिक,

  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

  • सुरेश खाडे- सांगली,

  • संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

  • तानाजी सावंत-परभणी,

  • उस्मानाबाद (धाराशिव)

  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

  • अब्दुल सत्तार- हिंगोली,

  • दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

  • अतुल सावे - जालना, बीड,

  • शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

  • मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT