ajit pawar corona update lockdown 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील तीन जिल्ह्यात लॉकडाऊन? उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई -  राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून पुन्हा लॉकडाऊन होणार का याची चर्चा होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना लोकांकडून मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती घेऊन आरोग्य विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

राज्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमध्ये कोरोनाचा ससंर्ग खूपच वाढत चालला आहे. लोकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. कुणीही मास्क वापरत नाही त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करायचा का असा विचार सुरु असल्याचं उपमुख्यंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असून बैठकीत याबबात अंतिम निर्णय घेतला जाईल. आता पुन्हा लॉकडाऊन व्हावा अशी कोणाचीच इच्छा नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असंही अजित पवार म्हणाले. 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी आहे. मुंबई, पुण्यातही कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत चालले आहेत. राज्याचे गृहमंत्रीही सातत्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यापार्श्वभूमीवर बैठकही घेण्यात आली असे अजित पवार म्हणाले. राज्यात औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना याठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

राज्यात बुधवारी दिवसभरात 4 हजार 778 नवीन रुग्ण आढळले तर 40 जणांचा मृत्यू झाला. मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्न समारंभासह कार्यक्रमात गर्दी यामुळे रुग्णांची वाढ होत आहे. पुण्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण असून मुंबईतील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. राज्यात सध्या 38 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून राज्यात 7 लाख 40 हजार 831 जणांना लस देण्यात आली आहे. याबाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

SCROLL FOR NEXT