Devendra Fadnavis - Sharad Pawar
Devendra Fadnavis - Sharad Pawar Team eSakal
महाराष्ट्र

त्यांच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे 'लांगूलचालन'; फडणवीसांचा पलटवार

दत्ता लवांडे

मुंबई : काल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १४ ट्वीट करत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज शरद पवारांनी जळगाव दौऱ्यावर असताना माध्यमांना बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. फडणवीस यांच्या ट्वीटचा मी आनंद घेतो अशी मिश्कील टीका त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर आता फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांना बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी लावला. सामुदायिक ऐक्य संकटात येत असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रश्न सोडवणे ही आपली परंपरा आहे. आपण महाराष्ट्र एकसंघ ठेवला पाहिजे असं ते म्हणाले.

दरम्यान शरद पवारांच्या या वक्तव्यावर फडणवीस माध्यमांना बोलताना म्हणाले की, "धर्मनिरपेक्षता ही संकल्पना अनेक पक्षांनी अंगीकारली असून देशात सध्या सांप्रदायिकता वाढत आहे अशी जी ओरड चालू आहे याचं कारण हे या पक्षाचं 'लांगूलचालन'पणा आहे. त्यांच्या मते धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हा 'लांगूलचालना' असा आहे." असं ते बोलताना म्हणाले.

त्याचबरोबर काल केलेल्या ट्वीट बद्दल बोलताना ते म्हणाले की, "मी काल केलेले ट्वीट हे अतिशय बोलके होते आणि त्यावर आलेली प्रतिक्रिया ही त्यावरुनही बोलकी आहे. त्यावरुन त्या ट्वीटचं महत्त्व सगळ्यांना कळलं असेल. त्यामुळे त्या ट्वीटवर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही." असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी काल १४ ट्वीट करत शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकेचे संदर्भ दिले होते. त्यामध्ये त्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वेळी शरद पवारांची भूमिका, बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता पण त्यावर शरद पवारांचा विरोध होता, त्यानंतर मुस्लीम आरक्षणाला संविधानात विरोध असतानाही शरद पवारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. अशा विविध विषयांवर पावारांना चिमटा काढला होता पण त्या ट्वीटला उत्तर देताना मी त्यांच्या ट्वीटचा आनंद होतो एवढंच बोलून मुख्य उत्तराला पवारांडून बगल देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT