Devendra Fadnavis Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

...त्यावेळी त्यांनी आमचादेखील फोन उचलला नव्हता; फडणवीसांचा टोला

उद्धव ठाकरे यांनी माझा फोन उचलला नाही असा दावा संभाजीराजे यांनी केला होता.

दत्ता लवांडे

मुंबई: काल कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकांतून माघार घेतली. त्याआधी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर ते ठाम होते. पण शिवसेनेने शब्द पाळला नाही, शिवसेनेचे उमेदवारी नको असं म्हणत त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकांतून माघार घेतली आहे.

(Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray)

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या सत्तानाट्यात झालेल्या किस्स्याची आठवण करून दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुका सेना भाजपाच्या आघाडीने एकत्र लढवल्या होत्या. पण मुख्यमंत्रीपदावरून काही दिवस महाराष्ट्रात सत्तानाट्य पाहायला मिळालं होतं. "उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी आपलाही फोन उचलला नव्हता" असा टोला त्यांनी लावला आहे.

दरम्यान संभाजीराजे यांची उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी कोंडी केली आणि निवडणुकांतून माघार घेण्यास भाग पाडले असा आरोप त्यांनी लावला आहे. मुख्यमंत्र्यावर टीका करताना ते म्हणाले की, संभाजीराजेंचा फोन उद्धव ठाकरे यांनी उचलला नाही पण आम्ही ज्यावेळी निवडणुका जिंकलो आणि सत्ता स्थापण करण्यासाठी तयारी करत होतो त्यावेळी त्यांनीही आमचा फोन उचलला नव्हता असा टोला लावला आहे.

संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकांतून माघार घेताना शिवसेनेला आपल्या टिकेचा धनी बनवलं आहे. "मी माघार घेतोय पण हा माझा स्वाभिमान आहे. मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही, त्यांनी मला शब्द दिला होता पण नंतर माझा फोनही उचलला नाही" असा आरोप करत त्यांनी मी ही निवडणुकांतून माघार घेत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेवर बऱ्याच लोकांनी टीका केली होती.

त्यानंतर संजय राऊत यांनी आजच्या कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत आमची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली आहे त्यामुळे आम्ही कोल्हापूरची उमेदवारी संजय पवारांना दिली आहे. आता त्यांचा आणि आमचा विषय संपला आहे असं स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT