Devendra Fadnavis bjp and original eknath shinde Shiv Sena will together fight BMC polls sakal
महाराष्ट्र बातम्या

कमळ अन् धनुष्यबाण एकत्र येत BMC जिंकणार! फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांना सामोरे जाणार आहे. ही निवडणूक इतरवेळांपेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. (BMC polls)

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. अशातच नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणूक लढवण्याबाबत मोठ वक्तव्य केले आहे.

फडणवीसांनी शिंदे गटाला खरी शिवसेना असल्याचे सांगत, भारतीय जनता पक्ष आणि मूळ शिवसेना, शिंदे यांची शिवसेना एकत्र मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक लढवेल आणि जिंकेल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. शिंदे यांच्या गटात मुंबईतील आमदारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र लढून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT