विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी सभागृहात जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राम कदम व इतर.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी सभागृहात जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राम कदम व इतर. 
महाराष्ट्र

होय, महाराष्ट्रात 'ED' सरकारचं; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केलं. आज नव्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे नव्या सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकारच्या वतीने सभागृहात भाषण केलं. यावेळी त्यांनी दमदार भाषण करत आपण परत आल्याचं म्हटलं.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आपण केवळ एकटे परत आलो नसून शिवसैनिकांना घेऊन आलो आहोत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत कट्टर शिवसैनिक मुख्यमंत्रपदी विराजमान झाल्याचं त्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते जनतेचे सेवेकरी असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाचे आमदार मतदान करत असताना अनेकांनी 'ईडी'च्या घोषणा दिल्या होत्या. हाच धागा पकडून फडणवीसांनी ईडीसंदर्भात विधान केलं. फडणवीस म्हणाले की, अनेकांनी टीका केली की शिवसेनेचे आमदार ईडीमुळे आमच्यासोबत आले. ते खरच आहे. सर्व आमदार ईडीमुळेच आमच्या सोबत आले. मात्र ती ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा देखील आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच एकनाथ शिंदे यांची संपूर्ण कारकिर्द सभागृहात सांगितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

SCROLL FOR NEXT