Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

"छोटं का होईना, भाषण ऐकायला मिळालं"; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

देवेंद्र फडणवीस यांनी कवितेच्या स्वरुपात टीका केली.

सुधीर काकडे

मुंबई : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकावर (MVA) टीका केली आहे. ते म्हणाले, आज छोटं का होईना पण मुख्यमंत्र्यांचं भाषण आम्हाला ऐकायला मिळालं. महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते विसरले असतील की ५० हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यायचे होते, मात्र तरीही आम्हाला मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायला मिळालं याचा आनंद आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विंदा करंदीकरांची एक कविता देखील ऐकवली. तेच ते अन् तेच ते

"माकडछाप दंतमंजन,

तोच चहा तेच रंजन

तीच गाणी तेच तराणे,

तेच मूर्ख तेच शहाणे

सकाळपासून रात्रीपर्यंत

तेच ते अन् तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या

कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.

काकू पासून ताजमहाल,

सगळीकडे सारखेच हाल

नरम मसाला, गरम मसाला,

तोच तो भाजीपाला

तीच ती खवट चटणी,

तेच ते आंबट सार

सुख थोडे दु:ख फार" ही कविता ऐकवत

सरकार नावाची यंत्रणा उदास झाली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT