Devendra Fadnavis
Devendra Fadnavis google
महाराष्ट्र

स्वागताच्या मेगा इव्हेंटने फडणविसांनी फुंकलं महापालिकेचं रणशिंग, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

जनतेच्या आशीर्वादामुळेच विधानसभा निवडणुकांच यश मिळालं आहे. मी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिका (BMC) असतील किंवा मग नागपूर महापालिकेच्या निवडणुका असतील याठिकाणी भाजपचाच झेंडा लागणार आहे. २०२४ ला स्वबळावर सत्ता काबीज करत भाजप बहुमताचं सरकार स्थापन करेल असं सुचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गोव्यातील विजयानंतर फडणीस आज नागपुरात आले आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली असून ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

यावेळी ते म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे हे यश मिळालं. हा जनतेचा कौल आहे. राष्ट्रीय स्तरावर काम केलं की जबाबदारी बदलते. त्यावेळी सिद्धतेचं आव्हान असतं. नागपुरकांना केलेला हा सत्कार मी पंतप्रधान मोदी आणि गोव्याच्या जनतेकडून स्वीकारतो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तुमचं पुढचं मिशन काय ? या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं मिशन भाजप देईल तेच, आमचं मिशन एकच जनतेचं कल्याण, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, सरकार पडतील अशा संदर्भातील चर्चा मला करायची नाही कारण त्यावर पुन्हा वाद निर्माण होतात. ज्या दिवशी राज्यात निवडणुका लागतील मग त्या कोणत्याही असतील महापालिका, जिल्हापरिषद सगळीकडे भाजपाचा झेंडा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. २०२४ ला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता काबीज करणार बहुमत असेललं सरकार भाजपचं असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ज्यादिवशी महाराष्ट्रात निवडणुका लागतील त्यादिवसापासून भाजप एक नंबरचा पक्ष असेल असंही ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT