indra.jpg 
महाराष्ट्र बातम्या

विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड झाली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यासह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, छगन भुजबळ, अजित पवार आदी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर फडणवीस विरोधीपक्ष नेत्याच्या जागेवर विराजमान झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते सभागृहात चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शेजारच्या जागेवर बसत होते. आज विरोधीपक्ष नेते म्हणून निवड झाल्यानंतर ते त्या जागेवर विराजमान झाले.

काय घडले?
आज, सकाळी अकरा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. त्यावेळी हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाना पटोले यांची बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा केली. भाजपकूडन अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो भाजपने मागे घेतला. भाजपने ही सहकार्याची तयारी दाखवल्यानंतर विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात बदल करण्यात आला आणि विरोधपक्ष नेता निवडची पक्रिया आजच्याच कामकाजात समाविष्ट करण्यात आली.

तत्पूर्वी, फडवणीस यांना महाआघाडीने काल दणका दिल्याचे मानले जात होते. त्यानंतर आज, महाराष्ट्र विधिमंडळाच्या परंपरेनुसार बिनविरोध अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीने आग्रह धरला होता. त्यासाठी भाजपला सहकार्याची विनंती केली होती. त्या विनंतीला भाजपने मान दिला. हंगामी अध्यक्ष वळसे-पाटील यांनी दहाच्या सुमारास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर भाजप नेते आणि वळसे-पाटील तसेच महाआघाडीच्या नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली त्यानंतर भाजपने अर्ज माघारी घेतला.

काय म्हणाले नवे विधानसभा अध्यक्ष?
नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सभागृहातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी सभाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनंदनाची प्रक्रिया लवकर करण्याच्या सूचना सभागृहातील सदस्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

Mahur Crime : माहूर येथे प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT