devendra fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग करतानाचे फोटो व्हायरल, वाचा काय आहे प्रकरण

या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस खुप डॅशिंग दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या महराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहेत. अशात भाजप सत्ता स्थापनेचा प्रयत्न करतोय यात भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या घडामोडीमुळे नाही तर एका वेगळ्या विशेष प्रकरणाने.

हो. हे खरंय. सध्या देवेंद्र फडणवीसांचे काही जुने फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो त्यांच्या मॉडेलिंगच्या काळातील आहे. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस खुप डॅशिंग दिसत आहे.

नागपुरातील एका कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीसाठी हा फोटोशुट करण्यात आला होता. यापूर्वीही हे फोटो व्हायरल झाले होते आणि आता पुन्हा सोशल मीडियावर या फोटोंची चांगलीच चर्चा आहे.

2006 ला देवेंद्र फडणवीसांनी मॉ़डेलिंगला सुरवात केली होती. नागपूर येथील एका कपड्याच्या दुकानाने फडणवीस यांचे हे फोटो असलेल्या पाच होर्डिंग्ज शहरात लावल्या होत्या. या फोटोमध्ये त्यांनी रंगबेरंगी शर्ट मध्ये पोज दिल्या आहे. खरं तर फार कमी लोकांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस राजकारणात प्रवेश करण्याच्या आधी मॉडेलिंग करायचे.

सध्या हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या फोटोंवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. कोणी म्हणतंय ते खरंच मॉडेल होते तर कोणी म्हणतंय त्यांचं हे टॅलेंट पाहून छान वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT