Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)

फडणवीस म्हणाले की, नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे सगळे जिल्हे आहेत. मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे, मग ६ जिल्ह्यांचे काय घेऊन बसलात. यावेळी फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावताना म्हटलं की, मी त्यांना (अजित पवार) गुरुमंत्र देईल की जर येत्या काळात त्यांचं राज्य आलं आणि त्यांना जर दोन-चार जिल्हे स्वत:कडे ठेवायचे असेल तर ते कसं मॅनेज करायचं याचा गुरु मंत्र देईल.

यावेळी फडणवीस यांनी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देहद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्याचं म्हटलं. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आम्हाला अजिबात मान्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

पीएफआय बाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, जी कारवाई झाली, त्याविरोधात पुरावे आहेत. आम्ही महाराष्ट्रात त्यांच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक करत होतो. शिवाय केरळने देखील पीएफआय संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मात्र बंदी संदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेवर फडणवीस म्हणाले की, नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात. ते तुम्ही ऐकायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा. त्यांच्या विनोदावर प्रतिक्रिया देण्यासाठी मला वेळ नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT