Devendra Fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: नैतिकतेच्या मुद्यावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल

नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

धनश्री ओतारी

निवडणूक आयोग, राज्यपाल ब्रह्मदेव नाही. सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. आता नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. त्यांच्या या आव्हानाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray statement if you have any morals resign Supreme Court cji chandrajud decision)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत निकालाचे स्वागत केले. तसेच यावेळी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

काय म्हणाले फडणवीस?

भाजप सोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? असा संतप्त सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

नैतिकतेच्या गोष्टी तुम्ही सांगू नका, कारण तुम्ही खुर्चीसाठी नैतिकता सोडली. एकनाथ शिंदेंनी विचारांसाठी काम केलं. तुमच्याकडं आकडा नाही. त्यामुळं तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी करु नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. असही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीही नैतिकता असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. ज्या पक्षाने ज्यांना सगळे काही दिले. मात्र, तरी सुद्धा ते माझ्या पाठीत वार करायला निघाले.

ज्यांनी विश्वासघात केला, तेच जर मला विश्वासाबद्दल विचारत असतील, तर ते अयोग्य आहे. त्यामुळे मी राजीनामा दिला. सगळे देऊनही काही हपापले लोक माझ्यावर अविश्वास दाखवणे मंजूर नव्हते. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. आता थोडी नैतिकता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT