devendra fadnavis present in Mukhyamantri Parishad 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena V/S BJP : दिल्लीत शिंदेंऐवजी फडणवीस; नक्की मुख्यमंत्री कोण? ठाकरेंच्या सेनेचा सवाल

PM मोदींच्या मुख्यमंत्री परिषदेतला एक फोटो समोर आल्याने सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे

सकाळ डिजिटल टीम

PM मोदींच्या मुख्यमंत्री परिषदेतला एक फोटो समोर आल्याने सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे

भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहे. दरम्यान, या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. (devendra fadnavis present in Mukhyamantri Parishad of BJP in delhi)

दरम्यान, दिल्लीतील मुख्यमंत्री परिषदेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात, सेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ट्वीट करत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस यांना टोला लगावला आहे.

कायंदे ट्वीटमध्ये म्हणतात की, भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन केले होते. मात्र यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उपस्थिती लावली की काय? म्हणजे एकनाथ शिंदे नावालाच मुख्यमंत्री आहे तर.. असे म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे. त्यामुळे आता यावरुन अनेक चर्चांना ऊत आला आहे.

गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

मनिषा कायंदे याच्या ट्वीटनंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. "ही बैठक भाजपची होती, सरकारी पातळीवर नाही. त्यामुळे या बैठकीला केवळ भाजपचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मनीषा कायंदे यांनी 'ट्रोल' गिरी न करता थोडी माहिती घेऊन बोलले तर बरे होईल", अशा शब्दात त्यांना उत्तर दिले आहे.

भाजपच्या या मुख्यमंत्री परिषदेच पंतप्रधान मोदी आणि जे. पी. नड्डा यांनी उपस्थित राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले आहे. आप-आपल्या राज्यात राबवलेल्या कल्यणाकारी योजनांविषयी या परिषदेत अहवाल सादर करण्याच्या सूचना या परिषदेत देण्यात आल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून या परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. याशिवाय विविध योजनांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या परिषदेत चर्चा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT