Maharashtra CM Devendra Fadnavis addressing media after Vice President election results, criticizing opposition parties.

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis on Vice President Election Result : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालावरून फडणवीसांनी विरोधकांना लगावला टोला!

Devendra Fadnavis slams opposition over Vice President election results : निकालाआधी काँग्रेसे नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांचे मतदान झाल्याचे सांगितले गेले आणि असा दावाही केला गेला, की यावेळी विरोधकांची एकजुट दिसली.

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis Reacts to Vice President Election Results : उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे. या मतदानावेळी विरोधकांची जवळपास १५ मतं फुटल्याचे समोर आले आहे. यावरून आता भाजपकडून विरोधकांना टोला लगावला जात आहे. कारण, निकालाआधी काँग्रेसे नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांचे मतदान झाल्याचे सांगितले गेले आणि असा दावाही केला गेला, की यावेळी विरोधकांची एकजुट दिसली. परंतु निकालानंतर चित्र काही वेगळंच दिसत आहे.

यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांना टोला लगावला आहे. एनडीएची मतं फोडू असं म्हणणाऱ्यांना स्वत:ची मतंही राखता आली नाही, असं फडणवीसांनी म्हटलय. तसेच, सी पी राधाकृष्ण यांच्या विजयाबद्दल फडणवीसांनी त्यांचे अभिनंद केल, पंतप्रधान मोदींचे कौतुक करत एनडीए आघाडीच्या सर्व खासदारांचे आभारही मानले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, सी.पी.राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते आता भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत आणि ज्यावेळी त्यांची घोषणा झाली, त्यावेळी मला विशेष आनंद झाला. याचं कारण, त्यांची घोषणा करत असताना त्यांचा जो पत्ता सांगितला गेला तो मुंबई राजभवन हा पत्ता सांगितला गेला. त्यामुळे मुंबईतील, महाराष्ट्रातील नागरिक असलेले सीपी राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत. मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो.’’

तसेच ‘’देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला, त्यांचेही मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंद करतो, की त्यांनी अतिशय उत्तम असे राष्ट्रपती या देशासाठी निवडले आहेत. मला विश्वास आहे की, सीपी राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळात त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चित करतील.’’ असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.

विरोधकांना नेमका काय टोला लगावला? -

याशिवाय विरोधकांना टोला लगावत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले. एनडीएचे मतं आम्ही फोडू असं सांगितलं, पण झालं उलटचं. विरोधकांना स्वत:ची मतं देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशाप्रकारची अवस्था विरोधकांची आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT