devendra Fadnavis speak about Alliance After resign CM Post 
महाराष्ट्र बातम्या

युती तुटलेली नाही, चर्चेचे दरवाजे खुले : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्याचवेळी राज्यपालांनी त्यांना काळजीवाहून मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्याचे आवाहन केले आहे. त्याला आवाहनाला फडणवीस यांनी होकार दिल्याने ते राज्याचे काळजावाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. त्याचवेळी महायुतीमधील प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत झालेल्या मतभेदांवरही फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. मतभेद टोकाला गेल्यानंतरही शिवसेना-भाजप युती तुटलेली नाही. शिवसेनेसोबत चर्चेच दरवाजे खुले आहेत, असे फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यावर थेट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी 'आमच्यासोबत सर्व पर्याय खुले आहेत', असे वक्तव्य केल्याचा उल्लेख फडणवीस यांनी करून नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतरच्या पत्रकार परिषदेनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी पत्रकारपरिषद घेऊन खुलेपणाने भूमिका मांडली. राज्याच्या जनतेने महायुतीला कौल दिला होता. पहिल्या पत्रकार परिषदेतच मी महायुतीचं सरकार येईल, असं स्पष्ट केलं होतं, असं सांगून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली.'

अडीच वर्षाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

'फोडाफोडीचं राजकारण करणार नाही'
आज, सकाळपासून भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप होत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, 'आम्ही कोणत्याही प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण करत नाही. ती आमची संस्कृती नाही. सरकार स्थापन करतानाही आम्ही अशा प्रकारे कोणतिही जुळवाजुळव करणार नाही. जर, कोणाला आमिष दिल्याचा, पैसे दिल्याचा आरोप आमच्यावर कोणी करत असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT