Trupti Desai Devendra Fadnavis Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

त्यांचे पंख छाटले नाहीत तर...; तृप्ती देसाईंनी घेतली फडणवीसांची बाजू

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं अपेक्षित असतानाच फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या १० -१५ दिवसांपासून सत्तानाट्य रंगलं आहे. या सत्तानाट्यामध्येच शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदी येतील अशी अपेक्षा असतानाच पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर एक नाराजीचा सूर उमटत आहे. याचविषयी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी फडणवीसांची बाजू घेतली आहे. (Eknath Shinde Devendra Fadnavis)

तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात की, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी हा केलेला प्रयोग आहे‌. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देता येणार नाही.

५० आमदारांना सोबत घेऊन भाजपाचा हात धरत एकनाथ शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्रिपदाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आपण सत्तेबाहेर राहणार असं स्पष्ट केलं. मात्र शपथविधीला अवघी काही मिनिटे राहिलेली असतानाच थेट भाजपा पक्षश्रेष्ठी अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. अखेर पक्षाच्या आदेशामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT