Devendra Fadnavis Dikshabhumi esakal
महाराष्ट्र बातम्या

Dikshabhumi : बुद्ध धम्मातील तत्त्वांचा समावेश असलेलं, आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान सर्वात सुंदर आहे - देवेंद्र फडणवीस

विकसित देशाचा विकास हा बुद्ध (Buddha Dhamma) तत्वज्ञानानेच झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळवून दिली. तिथे कामाची गती वाढली असून डिसेंबर २०२४ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नागपूर : युद्ध न करता जिंकता येणारा, समता आणि बंधुतेची शिकवण देणारा, बुद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात दिला. यामुळे दीक्षाभूमी (Dikshabhumi) जगाच्या नकाशावर आली. आता जगभरातील बौद्धांच्या नव्हेतर अखिल मानवाच्या आकर्षणाचे केंद्र दीक्षाभूमी आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

विकसित देशाचा विकास हा बुद्ध (Buddha Dhamma) तत्वज्ञानानेच झाला आहे. यामुळेच दीक्षाभूमीच्या विकासाचे पर्व सुरु झाले असून २०० कोटीचा आराखडा तयार झाला आहे, असे प्रतिपादनही फडणवीस यांनी येथे केले. दीक्षाभूमीवर आयोजित ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन (Dhamma Chakra Pravartan Din 2023) सोहळ्याच्या पर्वावर उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. प्रमुख पाहूणे म्हणून थायलंडच्या डॉ. अफिनिता चाई चाना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलिस आयुक्त डॉ. अमितेशकुमार, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरवातीला दीक्षाभूमी विकासाचे ऑनलाइन भूमीपूजन झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा देऊन दलित पीडित समाजाला स्वाभिमान दिला, मानवता धर्म दिला ती दीक्षाभूमी. दीक्षाभूमी आणि आणि चैत्यभूमी ही पवित्र स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी २०० कोटीचा आराखडा तयार करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या स्थळांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

माझ्या भारताचे संविधान सर्वोत्तम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या भारत देशाला दिलेले संविधान सर्वात सुंदर आहे, यामुळेच जगात पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला आहे. संविधानात बुद्धाच्या धम्मतील तत्त्वांचा समावेश आहे, तीच मार्गदर्शक तत्त्वे म्हणून संविधानाने स्वीकारली आहेत. यामुळेच संविधानाने समता प्रस्थापित झाली. संविधानाने बंधुता प्रस्थापित केली. मी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमी विकासाचा ३०० कोटीचा आराखडा तयार केला होता. पहिल्या टप्प्यात ४० कोटीचा निधी नागपूर सुधार प्रन्यासकडे वळता केला. परंतु, त्याचे काय झाले हे कळले नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

डिसेंबर २०२४ पर्यंत इंदू मिल स्मारक होणार तयार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळत नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळवून दिली. तिथे कामाची गती वाढली असून डिसेंबर २०२४ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लंडनमध्ये ज्या निवासात बाबासाहेब राहिले ते घर सरकारने विकत घेतले. तेथे स्मारक उभारले. आता भारतातून लंडनमध्ये जाणारे बाबासाहेबांच्या त्या निवासस्थानाचे दर्शन घेतात, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT