DHANANJAY MUNDE
DHANANJAY MUNDE 
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंवर पुन्हा आरोप; सोशल मीडियावर पुन्हा केला खुलासा!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. आपले ज्या महिलेशी संबंध आहेत असं मुंडेंनी मान्य केलं होतं त्यांनीच तक्रार केली आहे. आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी कोंडून ठेवल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. याआधी महिलेच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली होती. 

आता झालेल्या आऱोपांनंतरही धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमात पुन्हा एकदा आपल्याविरोधात तक्रार दाखला झाल्याच्या बातम्या आल्यानं पुन्हा एकदा याबाबत खुलासा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यात त्यांनी न्यायालयात या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसंच विरोधी पक्षाला न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा फक्त प्रसिद्धी हवी असल्यानं आणि बदनामीच्या हेतुने सर्व काही केले जात असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.  

काय म्हणालेत धनंजय मुंडे?
आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून मा . उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे.  नंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशन च्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशन मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर  सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने मा.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. 
मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही.
कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.
धनंजय मुंडे

काय आहे प्रकरण?
आता ज्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या मुलांना डांबून ठेवल्याची तक्रार केली आहे त्या महिलेच्या बहिणीने महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. त्यात त्यांनी २००६ पासून आपल्यावर अत्याचार झाल्याचं आणि बॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून शरिरसंबंध ठेवल्याचा आरोप केला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर बलात्काराच्या आरोपाची तक्रा मागे घेतली होती. यावेळी कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं महिलेच्या बहिणीने म्हटलं होतं. 

आपल्या मुलांना कोंडून ठेवल्याची तक्रार करणाऱ्या महिलेशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून दोन अपत्ये झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तसंच आपण त्या मुलांना स्वत:चे नाव दिले आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण आपला तिच्याशी विवाह झाला असल्याचं त्यांनी म्हटलेलं नाही. दरम्यान या प्रकरणावरून भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT