Dhananjay Bijle Write Article about Sanjay Raut is real hero of Shivsena 
महाराष्ट्र बातम्या

शिवेसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यामागे 'या' रिअल हिरोचा हात

धनंजय बिजले

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार व ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी सर्वप्रथम असे सांगण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे अवघे 56 आमदार निवडून आले असतानाही पहिल्या दिवसापासून त्यांनी "मुख्यमंत्री शिवसेनेचाच' हा घोशा कायम लावला होता. आज त्यांचा शब्द खरा ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एकप्रकारे शिवसेनेसाठी तेच खरे "हिरो' ठरले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवादाचा पूल म्हणून संजय राऊत यांनी गेले महिनाभर चोख भूमिका निभावली. त्यामुळे एकमेकांवर टीका करणारे पवार व ठाकरे घराणी जवळ आली. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा काळ आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

सुरुवातीला ज्या वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे राऊत निक्षून सांगत, त्या वेळी त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नव्हते. याचे कारण म्हणजे शिवसेनेकडे असलेले संख्याबळ. अवघ्या 56 आमदारांच्या बळावर राऊत शिवसेनेला तसेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणत आहेत, अशीच सर्वांची भावना होती; पण खासदार राऊत पहिल्या दिवसापासून आपल्या भूमिकेवर ठाम होते. 

असा लाजिरवाणा विक्रम करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री

रोज सकाळी पत्रकारांना ते जेव्हा नवीन माहिती देत, त्या वेळी सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात असे; पण याला राऊत पुरून उरले. आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. केवळ टीव्हीवर बाईट व मुलाखती देऊन ते थांबले नाहीत, तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'मधून त्यांनी सातत्याने शिवसेनेची भूमिका निक्षून मांडली. भाजपवर आगपाखड करणारे त्यांचे अग्रलेख हा या काळात चर्चेचा विषय ठरले. यातून शिवसेनेची भूमिका अधिक घट्ट होत गेली. त्याचप्रमाणे सोशल मीडियातदेखील संजय राऊत यांच्या नावाचा डंका वाजत राहिला. या काळातील त्यांचे ट्‌विट तसेच शेरोशायरीच्या माध्यमातून त्यांनी नेमक्‍या शब्दांत शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट तुफान गाजल्या.

तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री

मात्र, राऊत यांची खरी मुत्सद्देगिरी दिसली ती पवार आणि ठाकरे यांच्यात संबंध प्रस्थापित करण्यात. कारण, तीस वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची भाजपबरोबर युती होती. ती एका रात्रीत तोडणे आणि दोन्ही कॉंग्रेससमवेत जाणे, ही अशक्‍य कोटीतील बाब होती. भाजपलाही तसेच वाटत होते. स्वतः उद्धव ठाकरेदेखील मोठा भाऊ, असाच मोदी यांचा उल्लेख करीत होते. अशा वेळी ठाकरे यांच्या मदतीला सर्वप्रथम राऊतच धावून आले. पत्रकार या नात्याने शरद पवार यांच्याशी असलेल्या जवळिकीचा राऊत यांनी शिवसेनेला फायदा मिळवून दिला. निकाल लागताच त्यांनी सत्ता मिळविण्याची हीच ती वेळ आहे, हे शिवसेना नेत्यांना पटवून दिलेच. शिवाय पवार यांच्याशी नियमित संवाद ठेवत महाविकास आघाडी प्रत्यक्षात आणण्यात मोठा हातभार लावला. समजा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास, त्यामध्ये राऊत यांचा मोलाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT