Dhangar Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Dhangar Reservation: धनगरांना मिळणार आरक्षण? १२ फेब्रुवारी रोजी महत्वाची सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गा बरोबरच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

धनगड म्हणजेच धनगर असून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गा बरोबरच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी  करणारी याचिका पुण्याचे भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील तसेच महाराणी अहिल्या देवी समाज प्रबोधीनी मंचचे, ईश्वर ठोंबरे व पुरुशोत्तम धाखोले यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

तर या याचिकांना विरोध करत वनवासी कल्याण आश्रमाच्यावतीने ऍड गार्गी वारूंजीकर यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायामूर्ती कमल खटा यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने सुनावणीवेळी काही मुद्दे उपस्थित केले तसेच त्याबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश पक्षकारांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT