Dilip Walse-Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेड झुगारताच गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, 'कोणाची तरी सुपारी..'

ओमकार वाबळे

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. कालपासून दोघेही मुंबईतील खार याठिकाणच्या निवासस्थानी आहेत. मात्र, शिवसैनिक यामुळे आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली आहे.

खारमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं. शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेले बॅगिकेड्स ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी इमारतीच्या आवारात घुसून राणांना आव्हान दिलं. नवनीत राणा सकाळी ९ वाजता हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणार होत्या. मात्र त्या आधीच सेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी राणांना खाली येण्याचं आव्हान केलं. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत राणा दाम्पत्य हे सर्व कोणाच्यातरी सांगण्यावरून करत असल्याचा आरोप केला.

महत्वाचे मुद्दे

राणा दाम्पत्याने कोणाची तरी सुपारी घेतली असावी

समाजात असंतोष निर्माण करण्याचे हे कृत्य आहे

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, हे दाखवण्याचा त्यामागचा उद्देश आहे

गेले 2-3 दिवस विनाकारण हा मेलोड्रामा सुरू आहे, आपापल्या घरी करा ना काय करायचं ते

पुढे काय करायचे पोलिसांना माहिती आहे

विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका

दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करण्याची गरज नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Nashik News : नाशिकच्या कालिका मंदिरात नवरात्रोत्सवाचा जयघोष: भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

SCROLL FOR NEXT