Dilip Walse Patil on Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

'फडणवीसांकडे किती बॉम्ब आहेत अन् ते कशावर फोडणार त्यांनाच माहिती'

चौकशी दरम्यान फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सभागृहात उत्तर देणार

सकाळ डिजिटल टीम

चौकशी दरम्यान फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सभागृहात उत्तर देणार

मागील काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवलेली नोटीस प्रकरणावरून भाजपा आक्रमक झाले आहे. काल चौकशी दरम्यान त्यांनी केलेल्या आरोपांवर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) सभागृहात उत्तर देणार आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा विरोधक आमने-सामने येणार असल्याची शक्यता आहे.

याप्रकरणी फडणवीसांना केलेल्या आरोपांवर गृहमंत्री सभागृहात उत्तर देणार आहेत. यावेळी प्रतिक्रिया देताना गृहमंत्री म्हणाले, कामकाज पत्रिकेत लक्षवेधीनंतरचे उत्तर आहे. मात्र आता समन्वयक समितीची बैठक असून यामध्ये किती वाजता उत्तर द्यायचे हे ठरणार असेल. या उत्तरात काय असणार आहे हेही त्यावेळीच कळणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले, त्यांच्याकडे किती बॉम्ब आहेत आणि ते कधी आणि कशावर फोडणार आहेत हे त्यांनाच माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या बदल्यांच्या (Police Transfer) घोटाळ्यासंबंधी (Scam) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना मुंबई पोलिसांच्या (Police) सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी शुक्रवारी नोटीस (Notice) बजावली. त्यानुसार, फडणवीसांनी रविवारी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. संदर्भात चौकशी दरम्यान केलेल्या आरोपांना आता गृहमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT