Sameer Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांच्या आरोपांनंतर वानखेडेंची चौकशी होणार? गृहमंत्री म्हणाले...

समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकू असं नवाब मलिक म्हणाले.

सुधीर काकडे

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीकडून केली जाणारी कारवाई ही हेतुपूरस्कर केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या प्रकरणात आपण लवकरच समीर वानखेडेंना तुरुंगात पाठवू असंही मलिक म्हणाले. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसिबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काय आरोप केले हे आपणास माहीत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्दभवत नाही असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री यांच्या वक्तव्यामुळे मलिक एकटे पडल्याचे दिसून येते.

मलिक यांच्या जावयाला वानखेडे यांनी अमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी अटक केली होती. ते तब्बल 7 महिने पोलीस कोठडीत होते. तेव्हापासून मलिक आणि वानखेडे यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष सुरू आहे. मलिक यांनी वानखेडे यांना नोकरीतून घरी बसवल्या शिवाय शांत बसणार नाही असा इशारा आज पत्रकारांशी बोलताना दिला. महिन्याभरापासन मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप करीत आहेत. मात्र गृहमंत्री पाटील यांनी आपणास याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गृहमंत्री आजपासून तिन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज रात्री नऊच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभरकोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग सध्या कुठे आहेत. अशी विचारणा केली असता, ते मलाही माहिती नसल्याचे हसून सांगत उत्तर देणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन भिजले

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT