Ayurveda Health Tips sakal
महाराष्ट्र बातम्या

Ayurveda Health Tips: तुम्हाला तंदुरूस्त राहायचं का? आयुर्वेदातील पंचसूत्रीचा अवलंब करा; स्वत:साठी वेळ द्या, वाचेल दवाखान्याचा खर्च

Ayurveda Health Tips: एका टप्प्यावर अनेक व्याधी गाठतात आणि मग तेव्हा वाटते त्याचवेळी आपण स्वत:कडे लक्ष द्यायला हवे होते. आरोग्याची काळजी घेताना पुढे जाऊन पश्चात्तापाची वेळ न येण्यासाठी २४ तासांपैकी किमान दहा तास तरी स्वत:साठी द्या. आयुर्वेदात दिनचर्याबद्दल स्पष्ट सांगितले आहे.

तात्या लांडगे

Ayurveda Health Tips : ‘टाईम इज मनी’ हे आपण सर्वत्र ऐकतो, पण त्यानुसार दिनचर्या बहुतेक लोकांची नसते ही वस्तुस्थिती आहे. पण, आयुष्यातील निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही हेही तितकेच सत्य आहे. वय पुढे पुढे जाते, त्यावेळी एका टप्प्यावर अनेक व्याधी आपल्याला गाठतात आणि मग तेव्हा वाटते त्याचवेळी आपण स्वत:कडे लक्ष द्यायला हवे होते.

आरोग्याची काळजी घेताना पुढे जाऊन पश्चात्तापाची वेळ येवू न देण्यासाठी दिवसातील २४ तासांपैकी किमान दहा तास तरी स्वत:साठी द्यायलाच हवेत. आयुर्वेदात माणसांच्या दिनचर्याबद्दल स्पष्ट सांगितले आहे.

आयुर्वेदात सांगितलेली ‘अभ्यंगा’ची पंचसूत्री...

  • - सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर म्हणजेच पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठावे. त्यावेळी सत्व गुण जास्त हा वेळ आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. त्यावेळी केलेला अभ्यास पटकन स्मरणात राहतो.

  • - ब्राह्मी मुहूर्त हा वाताचा काळ असतो. दिनचर्येतील भाग म्हणजे त्यावेळी केलेल्या मलमूत्र उत्सर्जनामुळे पुढचा त्रास कमी होतो.

  • - दंत धावन (दात घासणे) म्हणजेच गोड रस नको तुरट, तिखट रसाच्या पेस्टचा वापर करून दात घासणे अपेक्षित आहे. मुख व दाताच्या स्वच्छतेसाठी कडुनिंबाच्या काड्याही उत्तम ठरतात.

  • - थंडीच्या काळात अर्धशक्ती व्यायाम (तोंडाने श्वास घ्यायला लागेपर्यंत, घाम येईपर्यंत) उत्तम ठरतो. बाकीच्या मोसमात त्यापेक्षा कमी व्यायाम करावा.

  • - अभ्यंग म्हणजे डोक्याला तेल (शिरोभ्यंग), कानात (कर्ण पुरण) तेल सोडणे, तळपायाला (पादाभ्यंग) तेल लावणे म्हणजेच त्यामुळे डोळ्याला त्रास कमी होतो. अंघोळ करताना अंगालाही (अभ्यंग) तेल लावावे.

२४ तासातील वेळेचा असा करा सदुपयोग

आठ तास मनसोक्त झोप हवी. सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास जेवण करून रात्री दहापूर्वी झोपणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. त्यानंतर अभ्यंग करून दिवसभराचे काम आहे, त्यासाठी आठ तास द्यावेत.

उर्वरित आठ तासांचे अचूक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यातील दोन तास कुटुंब-मित्रांसाठी द्यावा. दोन तास व्यायाम, ध्यानधारणा करावी. दोन तासात आपला छंद जोपासा, आवड्यात खेळासाठी वेळ द्यावा आणि उर्वरित दोन तास टेन्शनमुक्तीसाठी मनोरंजनाला द्यावेत.

आजारी, ज्येष्ठ, चिमुकल्यांनी दिवसा झोपावे

अभ्यंग, अंजन (डोळे चांगले राहण्यासाठी काजळ घालावे), ठरवून काही न करता तहान लागल्यावर पाणी प्यावे, भूक लागल्यावर जेवण करावे, कोणत्याही वेगाचे धारण करू नये. पोटाच्या चार भागापैकी दोन भाग घन पदार्थ, एक भाग द्रव पदार्थ जेवणात असावेत आणि एक भाग मोकळा ठेवावा. जेवण करून झोपू नये, रात्री जागरण झाले असल्यास सकाळी जेवणापूर्वी त्याच्या निम्मा वेळ झोपावे. आजारी, ज्येष्ठ, चिमुकल्यांनी दिवसा झोपावे. उन्हाळ्यात दुपारी झोपले जरी चालते, इतरवेळी दुपारी झोपणे टाळावे.

- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेदतज्ज्ञ, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT