Sanjay Raut Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

त्याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही - संजय राऊत

"मोहन भागवत आणि संघाला सावरकरांविषयी प्रेम आलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो" असे राऊत म्हणाले.

दीनानाथ परब

मुंबई: "पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी (local body election) शिवसेना, (shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पुढचा महापौर आमचाच असेल" असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. पुण्यात (pune) शिवसेनेचा महापौर असावा, अशी पुणेकरांची इच्छा असल्याचे राऊत म्हणाले.

"देशात, राज्यात खूप पॅटर्न झाले. पण सध्या ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. ठाकरे-पवार पॅटर्न हा सध्याचा महाराष्ट्राच्या राजकारणातील चलनी पॅटर्न आहे. हे दोन पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले, तर काय होऊ शकते, हे दिसलं आहे. मतांचं विभाजन होऊ देणार नाही" असे राऊत म्हणाले.

"वीर सावरकरांबद्दल शिवसेनेची कायम तीच भूमिका राहिली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत" असे संजय राऊत म्हणाले. "मोहन भागवत आणि संघाला सावरकरांविषयी प्रेम आलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो" असे राऊत म्हणाले.

"राजकारण, तुरुंगवासात असताना काहीवेळा रणनीती ठरवावी लागते. दहावर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येऊन कार्य करावं, असं वाटलं. अशा परिस्थितीत जगभरात तुरुंगाबाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत, तो मार्ग अवलंबला म्हणून त्याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही" असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT