Work From Home Sakal
महाराष्ट्र बातम्या

आता पोलीस कर्मचारीही करणार 'वर्क फ्रॉम होम': दिलीप वळसे पाटील

कोरोनाच्या रूग्णांमुळे केंद्रासह विविध राज्यांनी सानधानतेचा प्रवित्रा घेतला आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : देशासह राज्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णांमुळे केंद्रासह विविध राज्यांनी (Corona Cases Raised In Maharashtra )सानधानतेचा प्रवित्रा घेतला आहे, तसेच रूग्णसंख्येला खीळ बसावी यादृष्टिने अनेक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्या अनुशंगाने राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटील यांनी दिली आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (Maharashtra Corona News In Marathi)

ते म्हणले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने 55 वर्षांवरील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी देखील अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता, असे ते म्हणाले. (Maharashtra Police)

यापूर्वीच्या कोरोनाच्या लाटांमध्ये (Corona Wave) ज्या पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती, त्याच प्रमाणे यावेळी देखील काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे (Covid 19 Protocol) तंतोतंत पालन करण्याचे आवाहन देखील वळसे पाटील यांनी यावेळी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT