Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: '...तर शरद पवार संसदेच्या उद्घाटनाला आले असते', भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

विश्वासात न घेता नवी संसद उभारली म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारवर केली होती टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र उद्घाटनाच्या मुद्दयावरून मोठं नाराजीनाट्य दिसुन आलं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर १९ छोट्या मोठ्या पक्षांनी मिळुन या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं दिसुन आलं. नवीन संसद भवन उभारताना विरोधकांना विचारात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं होतं. आता त्यांच्या या टीकेवर भाजप नेते राम शिंदे यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केल्याचं दिसुन आलं आहे. शरद पवार यांना संसदीय कामकाजाचा साठ वर्षांचा अनुभव आहे. या साठ वर्षांमध्ये त्यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. सत्तेमध्ये असताना विरोधी पक्षाची भूमिका काय असते आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय असते हे पवारसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणतात.

त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणं गरजेचं होतं. कदाचित इतर पक्षाच्या दबावामुळे ते सहभागी झाले नाहीत. अन्यथा पवारसाहेब नक्की या कार्यक्रमात सहभागी झाले असते असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

विश्वासात न घेता नवी संसद उभारली- शरद पवार

संस्थेची नवी इमारत बांधली जाणार असल्याचे मी वृत्तपत्रांमध्येच वाचले होते. ही इमारत बांधताना कोणाला विश्वासात घेतले नाही. अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता इमारत तयार झाली आहे.

संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे असं शरद पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT