E-pass esakal
महाराष्ट्र बातम्या

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

तात्या लांडगे

जिल्ह्यांमध्ये एन्ट्री करताना सुरू केलेली नाकाबंदीही बंद करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदी उठवण्याच्या अनुषंगाने ही प्रयत्न सुरु असून प्रवाशांना आता ई-पासशिवाय स्वतःची गाडी घेऊन फिरता येणार आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने 15 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले. या पार्श्वभूमीवर राज्यभर जिल्हाबंदी लागू करून ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. ई-पासशिवाय (E-pass) एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर निर्बंध घातले होते. आता कोरोनाची लाट आटोक्यात आल्याने की ही पद्धत करण्यात आली आहे. नाकाबंदीही हटविण्यात आली (The blockade was also lifted) आहे. आता सोमवारपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. (E-pass is no longer required while traveling from one district to another)

राज्यात 10 मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. राज्यातील सर्व शहरांसह ग्रामीण भागातही रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आणि मृत्युदर ही चिंताजनक होता. आता बहुतांश जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्या शहर-जिल्ह्यातील एकूण कोरोना चाचणीच्या तुलनेत किमान पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता 25 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत आहे, अशा ठिकाणचे निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित जिल्ह्यांमध्ये एन्ट्री करताना सुरू केलेली नाकाबंदीही बंद करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदी उठवण्याच्या अनुषंगाने ही प्रयत्न सुरु असून प्रवाशांना आता ई-पासशिवाय स्वतःची गाडी घेऊन फिरता येणार आहे.

मात्र, त्यावेळी संबंधितांनी कोरोनाचे नियम तंतोतंत पाळणे बंधनकारक असणार आहे. 15 एप्रिलपासून सोलापूर शहर-जिल्ह्यातून जवळपास एक लाख व्यक्तींनी ई-पासद्वारे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी ज्यांची कारणे रास्त होती, त्यांना पोलिसांच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली. तर काहींनी ई-पासशिवाय प्रवास केल्याने त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. तर काही जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली. आता जप्त केलेली वाहने दंड भरून सोडली जात आहेत. तर प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आता त्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी e-pass लागणार नाही. त्यासंबंधिचे नवे आदेश आज रात्रीपर्यंत काढले जाणार आहेत.

सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आला आहे. तरीही, नागरिकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बेशिस्तपणे विनाकारण नियमांचे उल्लंघन करत शहरात करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई सुरुच राहणार आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार नाकाबंदी उठविली असून प्रवाशांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी सोमवारपासून (ता. 7) e-pass ची गरज लागणार नाही.

- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, सोलापूर

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणारच

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारा ई-पास ही पद्धत बंद करण्यात आली आहे. तरीही, कोरोना संबंधीचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच राहणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पुढे सुरूच राहणार आहे. कोरोना च्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सर्वांना नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील, असेही पोलीस आयुक्तांनी यावेळी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. (E-pass is no longer required while traveling from one district to another)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT