Anil Parab Sakal
महाराष्ट्र बातम्या

सेनेला दुहेरी झटका? अनिल परबांवर अटकेची टांगती तलवार

परब यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची गेल्या नऊ तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. दरम्यान, परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्च सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जर परब यांना अटक झाली तर, शिवसेनेला दुहेरी झटका बसू शकतो. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्यानंतर आज सकाळपासून ईडी कार्यालयात परब यांची चौकशी सुरू असून, परब यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे. (Anil Parab Latest News In Marathi)

दरम्यान काही दिवासांपूर्वी अनिल परब (Anil Parab) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस बजावली होती. यानंतर ते शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आपण चौकसीसाठी ईडी (ED) कार्यालयात जाऊ शकलो नव्हतो असे परब यांनी सांगितले होते. भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somayia) यांनी परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर झाले आहेत.

काय आहे प्रकरण
अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी 2020 मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटी रुपयांना विकली. यामध्ये अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. यादरम्यान या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी काही पुरावे ईडी कार्यालयात सादर केले होते. तसेच अनिल परब यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असे म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मंत्री
अनिल परब हे शिवसेनेचे तगडे नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई पोलिसांचे माजी एपीआय सचिन वाझे यांनीही त्यांच्यावर 50 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

Paithan Pachod News: आधुनिक वॉटर प्युरिफायरला मागे टाकत पाचोडच्या आठवडे बाजारात ‘गरिबांचा फ्रिज’ मातीच्या माठांना उसळीची मागणी

Latest Marathi News Live Update : अत्याचार, बलात्कार आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जातेय - अरविंद सावंत

SCROLL FOR NEXT