Sanjay Raut on Kirit Somaiya e sakal
महाराष्ट्र बातम्या

'लफंगा, चोर; कसाबपेक्षा मोठा गुन्हा', राऊत सोमय्यांवर भडकले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ईडीने संजय राऊतांची मालमत्ता (ED Raid on Sanjay Raut) जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) आक्रमक भूमिका घेतली असून किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे. तसेच सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. हा देशद्रोही माणूस लोकांची फसणवूक करतो. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, असं संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut on Kirit Somaiya)

''भाजपचा माणूस राजभवनात बसला आहे. आमचे पक्षप्रमुख तिथे बसलेले नाहीत. कोट्यवधी रुपये जमा झालेले नाहीत. या माणसानं त्याचं डोकं आणि मेंदू तपासून घ्यावा. तुम्ही दाखवता ते पुरावे. आम्ही दाखवतो ते शेंगदाण्याचे कागद आहेत का? हा माणसू वेडा आहे. किरीट सोमय्या महाराष्ट्राला लागेलली किड आहे. त्यांना आमची शिवसेना संपवणार. हा माणूस मला पराक्रम सांगतोय का? हा देशद्रोही आहे. हा लफंगा चोर विक्रांतच्या नावावर पैसे गोळा करतो. हजारो सैनिकांच्या रक्ताचा अपमान आहे. कसाबपेक्षा मोठा गुन्हा आहे हा'', असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केले आहेत. तसेच सोमय्यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

''हा लफंगा माणूस मला पुरावे मागतोय. किरीट सोमय्याची मला पुरावे मागण्याची लायकी आहे का? आम्ही तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यावर तुम्हाला त्रास होतोय का? राजभवनातून आलेलं पत्राचा पुरावा आमच्याकडे आहे. हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या आहेत'', असा आरोपही राऊतांनी केला आहे. तसेच सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. त्यांनी काही आक्षेपार्ह शब्द देखील वापरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Rishabh Pant Replacement : रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी? ना इशान, ना संजू; BCCIने जाहीर केलं दुसरंच नाव

Harshvardhan Sapkal: भाजप, राष्‍ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळीचा नारद!

Soldier Death:जवानाच्या चितेला अग्नी देण्यासाठी ८ तासांच बाळ अन् पत्नी स्ट्रेचवरून आली, सातारा हळहळला; मुलीचा चेहरा पाहण्याआदीच मृत्यूने गाठलं...

SCROLL FOR NEXT