fadnavis and bawankule
fadnavis and bawankule 
महाराष्ट्र

उकेंची चौकशी बूमरँग? भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंवर पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाची कारवाई सुरू आहे. ईडीचं पथक सकाळीच नागपुरात पोहोचलं आणि धडक कारवाईला सुरुवात झाली. उके यांनी कायम भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये फडणवीस, बावनकुळे, गडकरींसारख्या विदर्भाच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. (ED raids Satish Uke House in Nagpur)

त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. एका जमीनीच्या प्रकणात ही कारवाई झाली. पण सतीश उके यांच्याकडे भाजपच्या मोठ्या नेत्यांविरोधात पुरावे आहेत. याबाबत ईडीला काही माहिती हाती लागल्यास किंवा ही कागदपत्र उकेंनी बाहेर काढल्यास फडणवीस आणि बावनकुळे अडचणीत येणार, हे स्पष्ट झालंय.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात उके यांनी याचिका दाखल केलीय. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ३० ऑक्टोबरपासून पुराव्‍यांची तपासणी सुरू करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या अडचणी वाढू शकतात. २०१९ पासून हा खटला सुरू आहे.

यामध्ये फडणवीसांना साक्षीदारांची उलटतपासणी करता येईल. पण याचिकाकर्त्यांचे आरोप सिद्ध झाल्यास ६ महिने कैद, १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते. फडणवीस यांच्यावर कलम ४२०, ४६७, ४६८ फसवणूक, बदनामी, कागदपत्रांमध्ये हेराफेरी करणे,इ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बावनकुळेंविरोधात साक्षीदारच आणून बसवला

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर देखील भ्रष्टाचाचे आरोप झाले. बावनकुळे पाच हजार कोटींचे मालक असून त्यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा असल्याचा आरोप झाला. पाच फ्लॅट व चार महागड्या कार देखील असल्याचं बावनकुळेंच्याच नातेवाईकांनी सांगितलं. सूरज तातोडे असे आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे आहेत. सतीश युके यांनी सुरज यांना नागपुरात आणलं. आणि पत्रकार परिषद घेतली. याचवेळी त्यांच्या रडारवर बावनकुळे आल्याचं स्पष्ट झालं.

बावनकुळे मंत्री असताना सूरज तातोडे नागपूर आणि मुंबईतील त्यांच्या बंगल्यावर कामाला होते. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सूरज यांच्याकडे द्यायचे. दोन वर्षांत जवळपास शंभर कोटींचा काळा पैसा बावनकुळेंनी ठेवायला दिल्याचं तातोडेंनी सांगितल्यानंतर घडामोडींना वेग आला.

या सगळ्या प्रकरणात उके यांचा हात असल्याचा संशय भाजपच्या नेत्यांना आहे. त्यानंतर आज उके यांच्यावर कारवाई झाली. फडणवीसांच्या खटल्यातील महत्वाचे कागदपत्र उके यांच्याकडे आहेत. ते नष्ट करण्यासाठी ही कारवाई झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT