NCP leader Eknath Khadase  
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स; उद्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं समन्स बजावलं असून उद्या (गुरुवार) सकाळी ११ वाजेपर्यंत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीनं खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना काल रात्री अटक केली होती. त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

खडसेंचे जावई गिरीष चौधरी यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी चौकशीसाठी बोलावून ईडीने त्यांना अटक केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता ईडीनं खुद्द एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाणं आलं आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचं प्रकरण फडणवीस सरकारच्या काळात चागलंच गाजलं होतं. खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती. मंत्रिपदावर असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप झाल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागत होता. यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू सुरू झाली होती. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मधल्या काळात खडसेंनी फडवणीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लावू असं जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT