bhawan gawali esakal
महाराष्ट्र बातम्या

ED : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीकडून समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेच्या (shivsena) खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भावना गवळींना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये कन्व्हर्ट केल्या प्रकरणी सईद खान (saeed khan) यांना काल (ता.२८) अटक झाली होती. सईद खान हे कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, यामुळे आता भावना गवळींच्या अडचणी वाढू शकतात.

खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत. मिळालेल्या बातमीनुसार शिवसेना खासदार भावना गवळीना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. यानंतर सोमवारी (ता.४ ऑक्टोबर) हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आला आहे, भावना गवळीच्या ट्रस्टच्या संचालक सईद खानला नुकतीच ईडीने अटक केली होती. ट्रस्टला कंपनी रुपांतर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

'ईडी'ने रिसोड व देगाव येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएएमएस कॉलेज तसेच रिसोड तालुक्यातील भावना अॅग्रो लिमिटेड या संस्थांशी संबंधित असलेल्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नास नकार दिल्याने घटस्फोटीत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; हिंदू संघटना आक्रमक, आरोपी रफीकचा जंगलात आढळला मृतदेह

मुहूर्त ठरला! झी मराठीची 'शुभ श्रावणी' 'या' दिवशी येणार भेटीला; नव्या मालिकेसाठी 'या' सिरीयलला फटका

बाबो...! तमन्नाने सहा मिनिटांसाठी घेतले 6 कोटी, नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्ना भाटियाची धमाकेदार नृत्य, Viral Video

अर्जुन तेंडुलकर-सानिया चंढोक यांच्या लग्नाची तारीख ठरली; सचिन तेंडुलकरचा लेक लवकरच चढणार बोहोल्यावर

Viral Video : 'माझ्या घरात तिला ठेवायला जागा नाही'..आईला वृद्धाश्रमात सोडणारी निर्दयी मुलगी; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT