Students_SSC 
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत? मग ही बातमी वाचाच!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहेत. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच, अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.

तसेच, त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्‍नोत्तरातून संवाद साधला जाणार आहे. त्यासाठी ५९६ शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘‘दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत एकदा विषय कळाला नाही तर विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तर इतर समस्या समुपदेशक संवादातून सोडवू शकता. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी आत्मविश्‍वासाने सामोरे जाईल.’’
- वर्षा गायकवाड, शिक्षण मंत्री

- समुपदेशक आणि विषय तज्ज्ञांची यादी पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT