Political News esakal
महाराष्ट्र बातम्या

खडसेंनी घेतला अमृता फडणवीसांच्या रिप्लायचा धसका; न बोलणंच बरं..

अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक - खडसे

सकाळ डिजिटल टीम

अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक - खडसे

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अमृता फडणवीस यांना मुंबई (BMC) महापालिकेला वाहतुकीवरुन केलेल्या वक्तव्यामुळं लक्ष्य केलं जात आहे. त्यांनी मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडीमुळं घटस्फोट होतात असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानमुळे सध्या अनेक स्तरावरून प्रतिक्रिया येत असून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता भाजपाचे एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांनीही अमृता फडणवीस यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे (शिक्रापूर) येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयावर बोलणं टाळलं. यावेळी खडसे म्हणाले, अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक, त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली तर त्यांच्या फार तिखट प्रतिक्रिया येतात त्यामुळे न बोलणंच बरं, असे ते म्हणाले आहेत.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

दोन दिवसापूर्वी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबत भाष्य केलं होतं. त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. 'तुम्ही हे विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी आहे. जेव्हा मी काही बोलते तेव्हा मी सामान्य स्त्री म्हणून बोलत असते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा इतर गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. आज मुंबईतील खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होतं आणि या ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, असंही त्या म्हणाल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही फडणवीस यांच्या या विधानावर टीका केली होती. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील (Chandrakant Patil) यांनीही अमृता वहिनी जे बोलल्या, ते त्यांच वैयक्तिक मत असल्याचं नागपूर येथे बोलताना स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT