Eknath Khadse talks about Gopinath Munde  
महाराष्ट्र बातम्या

गोपीनाथ मुंडेंनी शेटजी, भटजींचा पक्ष बहुजनांचा करून दाखवला : खडसे

वृत्तसंस्था

परळी : गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय आता आम्हाला काम करावे लागत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी शेटजी, भटजींचा पक्ष हा बहुजनांचा करून दाखवला, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (गुरुवार) गोपीनाथ गडावर मेळावा होत आहे. या मेळाव्याला गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासारखे प्रमुख नेते उपस्थित आहेत. 

यावेळी बोलताना खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे आज असते तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर ही वेळ आली नसती. मुंडेंची पाठीत खंजीर खुपण्याची वृत्ती नव्हती. मुंडेंनी हसतखेळत राजकारण केले. आम्हाला तिकीट दिले नाही त्यामागे राजकारण आहे. या पाच वर्षात सरकार गेले. आमची तिकिट कापली गेली. पंकजा, रोहिणीचा पराभव केला गेला. आता राज्यात सत्ता, पैसा, ताकद, युती असताना आमचा पराभव झाला. ज्यांनी महाराष्ट्राच नेतृत्व केले त्यांनी आता हि पराभवाची जबाबदारी घ्यावी. गेल्या महिनाभरात आम्ही बरेच काही पाहिले आहे. माझ्या मुलीला न मागताही तिकिट देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane farmers: 'ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा'; कऱ्हाड तालुक्यात रास्ता रोको; चार हजार दराची मागणी

Manoj Jarange : "मी तयार आहे, आता 'नार्को' चाचणी कराच!" धनंजय मुंडेंचे आव्हान जरांगेंनी स्वीकारले, पोलिस प्रशासनाकडे मागणी

Parliament Session : हिवाळी अधिवेशनाची अल्पपरीक्षा; कमी कालावधीवरून विरोधकांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 ऑक्टोबर 2025

शालेय स्पर्धेतून क्रिकेट संस्कार!

SCROLL FOR NEXT