Eknath Shinde big responsibility entrusted to the son of Adsul  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनीही जोपासली घराणेशाही; मंत्र्याच्या मुलाला दिली मोठी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंनीही घराणेशाही जोपासली असल्याची चर्चा रंगली आहे. (Eknath Shinde big responsibility entrusted to the son of Adsul)

अभिजीत अडसूळ यांची शिंदे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिजीत अडसूळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते. अभिजीत अडसूळ हे यापूर्वी आमदार विभागप्रमुख होते.

आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्याचे शिंदे गटाचे नेते आहेत.अडसूळ हे शिवसेनेकडून तब्बल 5 वेळा खासदार राहिले आहेत. पण तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. ४० आमदार आणि काही खासदार गळाला लावले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

शिंदे गटाने नुकतीच युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या मुलांना मोठी पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे शिंदे गटातही घराणेशाहीचं दर्शन घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT