Eknath Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Latest News : बंडखोरीनंतर राज्याचे मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आता शिंदे गटाला आणखी एक लॉटरी लागण्याची शक्यता असून, केंद्रामध्ये शिंदे गटाला केंद्रातही कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी प्रतापराव जधवांच्या नावाची चर्चा आहे.

नुकताच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यात शिंदे गटाकडून नऊ आणि भाजपकडून नऊ अशा 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाला केंद्रातही कॅबिनेट मंत्रपद देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर, या पदासाठी प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शिवसेनाच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनीदेखील शिंदे गटाची साथ पकडली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर याबाबतची चर्चा सुरू होती या भूमिकेसाठी नेमकं काय बक्षीस दिलं जाईल आणि मंत्रीपद दिलं जाईल का? त्यात नुकतीच नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरसुद्धा एनडीएचा सर्वात मोठा घटक पक्ष शिंदे गट उरला असून, त्यांचे 12 खासदार आहेत.

त्यामुळे आता चर्चा अशी सुरू झाली आहे की, हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे गटाला एखादं कॅबिनेट मंत्रिपद केंद्रातदेखील मिळू शकतं. यासाठी शिंदे गटाकडून बुलढाण्याचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव यासाठी चर्चेमध्ये असून, एखादं राज्यमंत्री पद किंवा राष्ट्रीय पातळीवर एखाद्या कमिटीचं अध्यक्षपद हे देखील शिंदे गटाला दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT