Thackeray vs Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : "एकनाथ शिंदेंनी बाप देखील बदलला" ; ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखांची आज महत्वाची बैठक आहे. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. याचा देखील विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे. 

विनायक राऊत म्हणाले, "हिंमत असेल तर शिंदे गटाने सनदशीर मार्गाने कमवावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीवर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बाप देखील बदलले. काल-परवा पर्यंत बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता होते. आता अमित शाह त्यांना वडिलांसारखे वाटायला लागले आहेत. बाप बदलायाचा, नाव बदलायचं, झेंडा बदलायचा, ताटातील हिसकावून घ्यायचे, अशी बदमाश लोकांची औलाद आहे."

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसाठीचा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा वाद सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले. पण बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर इथलं शिवसेना भवन अजूनही उद्धव ठाकरेंकडेच आहे. 'साम'ने दिलेल्या माहितीनुसार, हे शिवसेनेचं मुख्यालय असलं तरी त्याची मालकी पक्षाकडे नाही, तर उद्धव ठाकरेंकडेच आहे. त्यामुळे शिंदे गट त्यावर दावा सांगू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nishikant Dubey: मुंबई गुजरातची, महाराष्ट्राची नाही, फक्त ३१-३२ टक्के मराठी लोक... निशिकांत दुबे पुन्हा बरळले!

Solapur Crime : बेडवर झोपलेल्या पत्नीचा वकिलाने केला खून; पोरक्या भाग्यश्रीला आत्यानं जिवापाड सांभाळलं, पण...

Abhijit Wanjarri: नागपूर पूरग्रस्तांसाठी २०४ कोटींचे पॅकेज अपुरे; अभिजित वंजारी यांची पॅकेज वाढीची मागणी

Latest Maharashtra News Updates : यंदा लवकर आलेल्या गणेश चतुर्थीमुळे कोकणात गणपती शाळांमध्ये उत्साहाची लगबग

'याला योनी प्रसूती म्हणावी...' 'माझं शरीर, माझी योनी आणि माझी मूल... मी स्वत:चे शब्द वापरू शकते', अभिनेत्रीचं ट्रोलर्सला चोख उत्तर

SCROLL FOR NEXT