Devendra Fadnavis Devendra Fadnavis
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद गेल्याच दुःख नव्हतं तर...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. महाराष्ट्रात चुकीचे सरकार स्थापन झाल्याने अस्वस्थ वाटत होते. मी मुख्यमंत्री झालो नाही याचे दुःख नव्हते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन समोर नेणारे सरकार महाराष्ट्रात आले नाही याचे दुःख होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. ५) प्रथमच नागपुरात आले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटलं म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद निर्माण झाली होती. यातूनच एकनाथ शिंदे यांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला. कोणीतरी बाळासाहेबांचे विचार घेत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. यामुळेच भाजपने एकनाथ शिंदे यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मला मुख्यमंत्रिपदाची कोणतीही आवड नव्हती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पुढे नेता येणार नाही, हे माहीत झाल्याने दुःख झाले. यामुळे योग्यवेळी योग्य गोष्टी करणार हे ठरवले होते. यासाठी लक्ष ठेवून होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सहकार्य करण्याचे आम्ही ठरवले. तसेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसैनिकाला (Shiv sena) मुख्यमंत्री करण्याचे ठरवले, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

उठावाला भाजपने साथ दिली

विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना सरकारमधील विरोध दिसत होता. शिवसैनिकांमध्ये असलेली अस्वस्थता दिसत होती. शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते. यातूनच शिवसेनेत उठाव झाला. या उठावाला भाजपने साथ दिली. कारण, २०१९ मध्ये अनैसर्गिक सरकार स्थापन झाले होते, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT