Devendra fadnavis eknath shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे सरकारची ताकद किती? फडणवीसांनी आकडेच मांडले!

एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या ९ - १० दिवसांपासून चाललेल्या सत्ताकारणाचा आता शेवटचा अंक चालू असल्याचं दिसत आहे. भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मविआ सरकारमधले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अवघ्या काही वेळात त्यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी बहुमताची ताकद दाखवत ही घोषणा केली आहे. (Eknath Shinde New Chief Minister)

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत सूरत, गुवाहाटी, गोवा असा दौरा करुन अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज मुंबईत परतले. काल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज लगेचच देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने बहुमत सिद्ध करण्याची धावपळ सुरू केली. दरम्यान, गोव्यातून शिंदेही मुंबईत आले. राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमताचा दावा केला. राज्यपालांनीही ती मान्य केली आणि अखेर सत्तासंघर्ष पूर्णत्वाकडे आला.

काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. त्याचबरोबर त्यांनी आपल्याकडच्या संख्याबळाचं गणितही मांडलं. शिवसेनेचा (Shivsena) विधिमंडळ गट, भाजपा (BJP) विधिमंडळ गट, अपक्ष १६ आमदार आपल्यासोबत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आता काही वेळातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज केवळ एकच शपथविधी होईल. शिंदे गटातले आमदार अजूनही गोव्यातल्या हॉटेलमध्येच आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

SCROLL FOR NEXT