Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार नरमले,न्यायालयाने फटकारल्यानंतर 'मविआ'ने मंजुर केलेल्या विकासकामावरील स्थगिती मागे

जिल्हा-तालुका पातळीवरील विकासकामांना दिलेली स्थगिती उठवली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हा या सरकारने महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिली होती. मात्र, मुंबई न्यायालयात राज्य सरकारला फटकारल्यानंतर काल (बुधवारी ४ ऑक्टोबर) हा स्थगितीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले आहे.

जिल्हा-तालुका पातळीवरील विकासकामांना दिलेली स्थगिती उठवली आहे. दरम्यान विकासकामांना एकदा मंजुरी दिल्यानंतर सरकार बदलले म्हणून स्थगिती कशी काय दिली जाऊ शकते?असा सवाल केला होता.'राज्य सरकारचा हा कारभार योग्य नसून, आम्ही तो मान्य करणार नाही. राज्यात असा चुकीचा पायंडा आम्ही पाडू देऊ इच्छित नाही', असं मुख्य न्यायमूर्तींनी राज्य सरकारला फटकारलं होतं.

मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणातील ८४ याचिका निकाली काढल्या आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेल्या निधीचा फेरविचार करण्याचा सरकारला अधिकार आहे, की नाही याबाबत न्यायालयाने या याचिका निकाली काढताना याबाबत भाष्य केले नाही.

महाविकासआघाडीने मंजूर केलेल्या राज्यातील विकास कामांना स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात राज्यभरातून हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. हायकोर्टाकडून देखील या याचिकांची गंभीर दखल घेत सरकारला फटकारलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT