महाराष्ट्र

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या हयातीतच स्थापन झाली होती प्रतिशिवसेना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडानंतर ढवळून निघालेलं राज्यातील वातावरण आता खरंच सत्तांतराच्या वाटेनं वाटचालं करतंय की काय यावर विश्वास बसण्यास सुरुवात झाली आहे. कारण गुवाहटी येथील हॉटेलेमध्ये बंडखोरी केलेल्या शिंदेसेनेच्या गटाचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असून, शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray) असं शिंदे गटाचे नाव ठेवण्यास आल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण शिवसेनेतून बाहेर पडून प्रतिशिवसेना स्थापन करण्याच्या प्रयत्नांची ही पहिली वेळ नसून, 1969 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच प्रतिशिवसेना स्थापन झाली होती. तो किस्सा नेमका काय हे आपण आज जाणून घेऊया. (Bandu Shingare News)

शिवसेनेला (Shivsena) 1969 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत 40 उमेदवार निवडून आलं होतं. त्यामुळं पक्षाला मोठं यश मिळालं होतं. या विजयाच्या यादीत भाई शिंगरे यांचाही खारीचा वाटा होता. मात्र, भाई शिंगारे यांचे भाऊ बंडू शिंगारे यांचा मुंबईतील लालबाग परभ भागात चांगलाच वचक होता. भाईगिरीतही ते आघाडीवर होते.

1970 मध्ये बंडू शिंगारे यांनी स्थापन केली प्रतिशिवसेना

सध्या ज्या पद्धतीने वाढत्या महागाईमुळं सामान्य जनता होरपळून निघत आहे. तशाचं पद्धतीने 1970 मध्ये महागाईने डोंगर गाठला होता. त्यात अनेक ठिकाणी वस्तूंचा साठेबाजार केला जात होता. त्यावेळी बंडू शिंगारे यांनी डंकन रोडवरील गोदामं फोडून सामान्यांना स्वस्त दराने कांदे आणि बटाटे शिवसैनिकांकडून उपलब्ध करून दिले होते. याकाळात बंडू शिंगारे यांच्यावर आर्थिक अफरातफरीचं आरोप झाल्याने खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितलं.

बाळासाहेबांच्या या निर्णयामुळे आणि भर सभेतील अपमान सहन न झाल्याने बंडू शिंगारेंनी थेट बाळासाहेबांना आव्हान देत त्यांच्या विरोधात बोलण्यास सुरू केले. एवढेच नव्हे तर, त्यांनी थेट वेगळा मार्ग पत्कारत बंडू शिंगारे (Bandu Shingare) यांनी प्रतिशिवसेनेची स्थापना केली. एवढं करू ते थांबतील असं बंडू शिंगारे नव्हते त्यांनी प्रतिशिवसेनेची स्थापना करण्याबरोबरच स्वतःला प्रतिशिवसेनाप्रमुख अशी उपाधीदेखील लावली.

मात्र, बाळासाहेबांच्या नखाची सर कुणीच घेऊ शकतं नाही हे गेल्या अनेक वर्षापासून कानावर ऐकू येणारे वाक्य तंतोतंत खरे ठरले. प्रतिशिवसेनेची स्थापना करूनही बंडू शिंगारेंना बाळासाहेबांसारखं वागणं आणि कामं करणं जमलं नाही. त्यामुळे बंडू शिंगारेंनी स्थापन केलेली प्रतिशिवसेना थंडावत गेली आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला फोडण्याचा बंडू शिंगारेंचा डाव फसला. (Eknath Shinde Latest News In Marathi)

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी पत्कारलेला मार्गही काहीसा 1970 ची आठवण करून देणारा आहे. त्यात त्यांनी त्यांच्या गटाच्या नावाचीदेखील घोषणा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं हे बंड आणि वेगळा गटाची स्थापना भविष्यात अस्तित्तवात आल्यास शिंदेंना यश येणार की बंडू शिंगारेंसारखा डाव फसणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र, शिवसेनेतून बंडखोरी करत प्रतिशिवसेना स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये हे मात्र खरं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT