Cabinet Expansion Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला! 'वर्षा'वर काल रात्रीच्या बैठकीत काय घडलं?

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री बैठक, मंत्रीमंडळ विस्तारासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. (Latest Marathi News)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल रात्री पुन्हा एकदा उशीरा बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशी ही बैठक पार पडली. तब्बल दोन तास ही बैठक चालली आहे. या रात्रीच्या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप या संदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, काल देखील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती. तर ही बैठक तब्बल 3 तास चालली होती.

दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

तिन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबतचे प्रश्न सुटले आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.

तर आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT