eknath shinde new tweet raise question over shivsena cm uddhav thackeray whip
eknath shinde new tweet raise question over shivsena cm uddhav thackeray whip  Sakal
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेवर दावा? थेट मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारवर संकट ओढावत असतानाच शिवसेनेने आमदारांना व्हीप जारी केला असून आज सायंकाळी ५ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या व्हीपवर एकनाथ शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. एका ट्वीटमध्ये त्यांनी पक्षावरच दावा केला असून व्हीपच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (eknath shinde new tweet raise question over shivsena cm uddhav thackeray whip)

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.'

भरत गोगावले हे गुवाहाटीमध्ये आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी पक्षाच्या मुख्य व्हीपची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे दिली असून अधिक आमदार त्यांच्यासोबत असल्याने त्यांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेला व्हीप वैध असल्याचे त्यांच्या ट्वीटवरून स्पष्ट झाले आहे. शिंदे यांच्या या ट्वीटवरून स्पष्ट झाले आहे की ते आता त्यांना आर-पारची भूमिका घेतली आहे आणि त्यांच्याकडे आमदारांचा मोठ्या गट असल्याचा दावा ठोकत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दणका दिला असून, एक तृतींश आमदार फोडून वेगळे झाल्यात ते स्वत:च शिवसेनेचे नेते असल्याचा दावा करू शकतात, हे आता स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत सरकार वाचवण्यात गुंतलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का असेल. 5 दशकांहून अधिक जुन्या पक्षातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठा झटका असणार आहे .असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेतेही शिवसेनेचे इतके मोठे नुकसान करू शकले नाहीत. दरम्यान, 6 दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये आमदारांच्या मुक्कामासाठी हॉटेल बुक करण्यात आले होते.

दरम्यान, 6 दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये आमदारांच्या मुक्कामासाठी हॉटेल बुक करण्यात आल्याची बातमी आहे. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्हाला 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते. त्यापैकी 37 हून अधिक आमदार एकट्या शिवसेनेचे आहेत.

शिवसेनेच्या वतीने व्हीप जारी करून आज संध्याकाळी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. जे नेते येणार नाहीत, ते शिवसेनेचे सदस्य नाहीत, असे गृहीत धरले जाईल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटानेही त्यांची गुवाहाटी येथे सभा होणार असल्याचे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT