Narayan Rane on Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंच्या नॉट रिचेबलवर नारायण राणे म्हणाले, ते कुठं आहेत...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केलंय

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केलंय

काल विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर आता महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कालपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. शिंदे हे गुजरातमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे आता सेनेचं टेन्शन वाढलं असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यावर सूचक वक्तव्य केलं आहे. (Narayan Rane on Eknath Shinde)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ते कुठं आहेत याबाबत असं काही सांगावं लागत नाही. त्याला नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न राणेंनी केला आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे.

पुढे बोलताना नारायण राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचं राहिलं काय असा प्रश्न करत राज्यात आणि देशात पक्ष संपत चालला असल्याचे त्यांनी म्हटले. विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर अंकुश नसल्याने पराभव झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसणार असल्याची माहिती आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT